राज्यात कृषी विद्यापिठ सुरू करण्याचा विचार:चंद्रकांत कवळेकर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मडगाव: भविष्यात गोव्याला कृषी राज्य म्हणून ओळखले जाईल.तरुण पिढीला शेती व्यवसायात प्रेरित करण्यासाठी विविध प्रकारच्या शेती व्यवसायात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.त्याचप्रमाणे गोव्यात कृषी विद्यापिठ सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.

दक्षिण गोव्यातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्पातील जिल्हाधिकारी इमारतीसमोर आयोजित केलेल्या ७१व्या प्रजासत्ताकदिन समारंभात राष्ट्रीय तिरंगा फकडविल्यानंतर ते बोलत होते.सदर कार्यक्रमास मुरगाव येथील नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष क्लाफासियो डायस, दक्षिण गोव्याचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा, आमदार आलेक्स रेडिनाल्ड लॉरेन्स, जिल्हाधिकारी अजित रॉय, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक, पोलिस अधिक्षक अरविंद गावस, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर, स्वातंत्र्य सैनिक आणि नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी एकात्मतेवर आधारित गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.सुरवातीस उपमुख्यमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली आणि पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. अनील पै यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  

चिंबल भागात जिलेटीन स्फोटचे प्रकार

संबंधित बातम्या