गोळावली वाघ मृत्‍यूप्रकरणी पाचही जणांना नवव्या दिवशी जामीन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

वाळपई:नवव्‍या दिवशी पाचहीजणांना जामीन गोळावली - सत्तरी येथील म्हादई अभयारण्य क्षेत्रात झालेल्या चार वाघांच्या मृत्‍यूप्रकरणी कोठडीत असलेल्‍या पाचही संशयितांची तब्‍बल नऊ दिवसांनंतर जामिनावर सुटका करण्‍यात आली.संशयितांच्या बाजूंनी अॅड. यशवंत गावस यांनी न्यायालयात बाजू मांडली.पावणे कुटुंबातील कर्ते पुरुष कोठडीत असल्‍यामुळे महिला एकाकी पडल्या होत्या.घरात कोणीही पुरुष नसल्याने त्‍यांचे कामाचे हाल झाले होते. याची सर्व पडताळणी करण्यात आल्‍यावर न्‍यायालयाने जामीन मंजूर केला.

संशयीत म्हणून गोळावली गावच्या बोमो पावणे, मालो पावणे, विठो पावणे, ज्योतिबा पावणे, भिरो पावणे या पाचजणांना वनखात्याकडून अटक करण्यात आली होती. वरीलपैकी बोमो पावणे, मालो पावणे, विठो पावणे यांना प्रथम अटक करून त्यांना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर ज्योतिबा पावणे व भिरो पावणे यांना अटक केली होती. त्यानंतर सर्व पाचही जणांना सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती.ती आज शुक्रवारी संपुष्टात आल्याने दुपारी वाळपई न्यायालयात संशयितांना हजर करण्यात आले.न्यायालयाने दोन्हींही वकिलांची बाजू ऐकून पाचही जणांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. तसेच पुढील दिवसांत सकाळ, संध्याकाळी माळोली येथील वनखात्याच्या कार्यालयात हजर राहण्याचे निकालात म्हटले आहे.गोळावलीतील घटनेने राज्य हादरले होते.त्यानंतर तपास काम जलदगतीने हाती घेण्यात आले. त्यात वरील पाच संशयीत म्हणून अटक केले होते.

वाघाची नखे कुठे गेलीत?
५ जानेवारी रोजी पहिला नर वाघ मृतावस्‍थेत सापडल्यानंतर शवचिकित्सेवेळी त्याची नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले होते. ही नखे अजूनही सापडलेली नाहीत.ती नखे कोणी काढली याचा शोध जारी आहे.

पिसुर्ले सत्तरीत खनिज माल उचलण्यास शेतकर्यांचा विरोध​
वाळपई पोलिस करतात दुधाची विक्री!
गोळावलीतील पावणे कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी, असे निवेदन ठाणे पंचायतीने दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी दखल घेत पावणे कुटुंबियांची भेट घेतली होती.त्यांना आरोग्यसेवा पुरविणे, पोलिस सुरक्षा देणे, वाहनांची सोय करणे अशी आश्वासने दिली होती.त्याची पूर्तता केली जात असून गाय, म्हशींचे काढलेले दूध दुग्ध सोसायटीवर पोहोचविण्याचे काम वाळपई पोलिस करीत आहेत.आता संशयितांना जामीन मिळाल्याने काहींसा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या