गोव्यातील स्पर्धेत सर्व प्रमुख खेळाडूंचा सहभाग

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजी : ऑलिंपिक आणि गोव्यातील क्रीडा स्पर्धा एकाच वर्षी होत आहे, त्याचा परिणाम ३६व्या राष्ट्रीय स्पर्धेवर अजिबात होणार नाही, उलट सर्व प्रमुख खेळाडू गोव्यात यावेत यासाठी आपण भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असे सांगत नरेंद्र बत्रा यांनी राष्ट्रीय स्पर्धा ‘फ्लॉप-शो’ होणार नसल्याचा विश्वास शनिवारी व्यक्त केला.

पणजी : ऑलिंपिक आणि गोव्यातील क्रीडा स्पर्धा एकाच वर्षी होत आहे, त्याचा परिणाम ३६व्या राष्ट्रीय स्पर्धेवर अजिबात होणार नाही, उलट सर्व प्रमुख खेळाडू गोव्यात यावेत यासाठी आपण भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असे सांगत नरेंद्र बत्रा यांनी राष्ट्रीय स्पर्धा ‘फ्लॉप-शो’ होणार नसल्याचा विश्वास शनिवारी व्यक्त केला.

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी गोव्यातील स्पर्धा वलकांयित आणि स्टारस्टडेड असेल असे ठासून सांगितले. ते म्हणाले, ‘‘टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा जुलै-ऑगस्टमध्ये होत आहे. गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा ऑक्टोबरच्या उत्तरार्धात होईल. ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या भारतीय क्रीडापटूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि ते नव्या उमेदीने ताजेतवाने होत गोव्यातील स्पर्धेत खेळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर्व प्रमुख खेळाडू गोव्यात यावेत यासाठी आयओएच्या माध्यमातून मी स्वतः प्रयत्नशील राहीन.’’ टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे, तर गोव्यातील ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

‘नेमबाजी, सायकलिंग स्पर्धा गोव्यात झाल्यास चांगलेच’

गोव्यातील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सायकलिंग आणि नेमबाजी हे क्रीडा प्रकार राज्यात सुविधा नसल्याने दिल्लीत घेण्यात नियोजन आहे. नेमबाजीसाठी वेळेत सुविधा तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. याविषयी बत्रा म्हणाले, की ``३६व्या राष्ट्रीय स्पर्धेतील सारे क्रीडा प्रकार गोव्यातच झाले असते, तर चांगले झाले असते, पण काही क्रीडाप्रकार राज्याबाहेर घ्यावे लागत आहेत, त्यास पर्याय नाही. नेमबाजी स्पर्धा गोव्यात व्हाव्यात यासाठी राज्य सरकार सकारात्मक आणि प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. साहजिकच आम्ही निश्चिंत आहोत.’’ साधनसुविधा निर्मितीत पुरेसा कालावधी नसल्याने सायकलिंग स्पर्धा गोव्याबाहेर झाल्यास त्यात वावगे काहीच नसल्याचे बत्रा यांनी नमूद केले. ऑलिंपिक स्पर्धेतही काही क्रीडा प्रकार मुख्य शहराव्यतिरिक्त अन्य शहरांतही होतात याकडे आयओए अध्यक्षांनी लक्ष वेधले. 

‘‘गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा योग्य कालावधी आहे. त्या काळात देशभरातील क्रीडापटूंना गोव्यात येण्यास नक्कीच आवडेल आणि सर्व प्रमुख क्रीडापटूंच्या सहभागाने ही स्पर्धा यशस्वी ठरेल. क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी लाभेल.’’
- नरेंद्र बत्रा,
अध्यक्ष, भारतीय ऑलिंपिक संघटना
 

संबंधित बातम्या