गावच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा : भावे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वेळूस येथे सत्कार करण्यात आलेल्या सत्कारमूर्ती समवेत भालचंद्र भावे, अक्तर शहा, रामदास शिरोडकर, संभाजी राऊत, फाल्गूनी शेठ व इतर.

वाळपई : गावच्या विकासात होत करू माणसाचा हातभार असेल तर गावचा विकास झपाट्याने होत असतो. त्यासाठी गावात एकोपा असला पाहिजे. हेच ध्येर बाळगून येथील नागरिक गावाच्या विकासासाठी पुढे येत असल्याने ते कौतुकास व खऱ्या सत्काराचे मानकरी ठरतात असे उद्‌गार सत्तरी तालुका साहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षक भालचंद्र भावे यांनी गुंडेलवाडा वेळूस सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात गावाच्या विकासात सामाजिक कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अक्तर शहा, नगरसेवक रामदास शिरोडकर, सर्व शिक्षा अभियानाच्या फाल्गुनी शेठ, प्राथमिक शिक्षक संघ गोवाचे महासचिव संभाजी राऊत, मुख्याध्यापक नारायण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाज सेवक रमेश झर्मेकर, सुभाष नाईक, देविदास कोटकर, चंद्रकांत नाईक यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. देविदास कोटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत नारायण कदम यांनी केले तर स्वाती कदम यांनी आभार मानले.

 

 

 

जनसेवा अर्बन कॉ. सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन

संबंधित बातम्या