Goa Top News: नाग पंचमी, कदंबा बसेवा, COVID-19 अपडेट

Akshay Badwe

मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु

जनहितासाठी सरकार (Goa Government) आपला आर्थिक फायदाही न पाहता जनसेवेसाठी कदंबा बस सेवा (Kadamba bus service) आज पर्यंत कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्या मागणीनुसार मोरजी ते पणजी अशी कदंबा बससेवा सुरु केली आहे.

Kadamba bus service in Goa | Twitter

Nag Panchami 2021: गोव्यातील सर्पपूजन परंपरा

गोव्याची भूमी जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण घटकांनी समृध्द असून, इथल्या नानाविध पर्यावरणीय परिसंस्थांत त्यांचे दर्शन घेता येते. पश्‍चिम घाट आणि पश्‍चिम किनारपट्टीवर ती वसलेल्या गोव्यात सरपटणाऱ्या प्राण्यांत सापांचे वैविध्य अनुभवायला मिळते.

Nag Panchami celebrated in Goa | Dainik Gomantak

Covid-19 Updates: गोव्यात कोरोनाचा धोका कायमच

राज्यात (Goa) मागील दोन दिवस कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची संख्या शून्य होती मात्र गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे तर नवीन 88 बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के झाले आहे. राज्यात बाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी (993) असली तरी अजूनही धोका टळलेला नाही.

COVID-19 virus | Unsplash

‘गोवा काजू फेणी’ कव्हरचे टपाल विभागाकडून प्रकाशन

गोवा टपालविभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान ‘गोवापेक्स 2021’ (Govapex 2021) या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात आज गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिझवी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Feni is Goa's traditional drink | Flickr