Pramod Yadav
43 खेळांचा सहभाग
गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळांचा विक्रमी सहभाग असेल, त्यात देशातील पारंपरिक खेळांचेही पदार्पण होईल.
पारंपरिक खेळ
रोल बॉल, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, काल्लियारापट्टू हे परंपरागत खेळ, तसेच लगोरी आणि गतका हे प्रदर्शनीय खेळ असतील.
लोगोचे अनावरण
37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे शानदार समारंभात रविवारी अनावरण झाले.
43 खेळ
गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळ असतील आणि स्पर्धेच्या इतिहासातील हा विक्रम आहे.
या खेळांचा समावेश
यावेळी जलतरण, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्डस-स्नूकर, बॉक्सिंग, कनोईंग-कयाकिंग, सायकलिंग, फुटबॉल व बीच फुटबॉल, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल
या खेळांचा समावेश
बीच हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, लॉन बॉल्स, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेटबॉल, रोईंग, रग्बी, सेपॅक टॅक्रो, नेमबाजी, स्क्वॉश, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलिबॉल
या खेळांचा समावेश
व बीच व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, यॉटिंग, रोल बॉल, योग, मल्लखांब, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, कालारीपायाट्टू, लगोरी (प्रदर्शनीय), गतका (प्रदर्शनीय) या खेळांचा समावेश आहे.