Pramod Yadav
टीव्ही शो आणि चित्रपटांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने पणजीतून काही फोटो शेअर केले आहेत.
गोवा संग्रहालयाच्या जवळील इमातीतून तेजस्वीने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तेजस्वी प्रकाश इमारतीच्या बाल्कनीतून बाहेर पाहत आहे, तिच्यासमोर मांडवी नदीचे पात्र आणि मागे अटल सेतू दिसत आहे.
तेजस्वीने या फोटोत काळा आणि करड्या रंगाचा ड्रेस घातला असून, ती अतिशय सुंदर दिसत आहे.
याशिवाय त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर केली आहे. यात तिने बर्गरचा फोटो स्टोरीत टाकला आहे.
तसेच, गोव्यातील रस्त्यावरून प्रवास करतानाचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे.
तेजस्वी प्रकाशने अलिकडेच एका मराठी चित्रपटात काम केले होते, त्यातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.
तेजस्वी चित्रपटांपेक्षा विविध टीव्ही शोमधून नेहमी प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली आहे.