बँक कर्मचारी ते केंद्रीय गृहमंत्री; Amit Shah यांचा लक्षवेधी प्रवास

गोमन्तक डिजिटल टीम

अमित शाह यांच्या कुटूंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील व्यापारी होते. वडिलांच्या व्यवसायात ते मदत करायचे.

Amit Shah | Dainik Gomantak

सुरवातीच्या काळात त्यांनी स्टॉक ब्रोकर म्हणूनही काम केले होते. अमित शहांनी अहमदाबाद सहकारी बँकेतही काही काळ काम केले होते.

Amit Shah | Dainik Gomantak

कॉलेजमध्ये असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले. 1982 मध्ये त्यांची नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट झाली.

Amit Shah | Dainik Gomantak

नरेंद्र मोदी 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. या काळात अमित शाह हे गुजरातचे सर्वाधिक शक्तिशाली नेता म्हणून समोर आले.

Amit Shah | Dainik Gomantak

मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमित शाह हे भाजपचे अध्यक्ष झाले. 24 जानेवारी 2016 रोजी त्यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले.

Amit Shah | Dainik Gomantak

2019 लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या मोठ्या विजयानंतर त्यांना भाजपचे चाणक्य असे संबोधले जाऊ लागले. तेव्हापासून ते केंद्रीय गृह मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Amit Shah | Dainik Gomantak

जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटविण्यासह NRC आणि CAA हे कायदे आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे.

Amit Shah | Dainik Gomantak
Dainik Gomantak