Pranali Kodre
अर्जेंटिना फुटबॉल संघाने 18 डिसेंबर 2022 रोजी कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले.
अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सवर पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने विजय मिळवत तब्बल 36 वर्षांनी विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
अर्जेंटिनाच्या या जेतेपदामुळे दिग्गज लिओनल मेस्सीचे विश्वविजेता बनण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.
अर्जेंटिनाच्या या जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅक्सिमिलियानो स्पिनेझ नावाच्या शेतकऱ्याने चक्क त्याच्या शेतात मेस्सीच्या चेहऱ्याचा आकाराने धान्य पिकवले आहे.
विशेष गोष्ट अशी की त्याने तब्बल 124 एकर जागेत धान्य पिकवून मेस्सीच्या चेहऱ्याची प्रतिकृती तयार केली आहे.
स्पिनेझने मेस्सीच्या चेहऱ्याची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्याच्या शेतात बियाणे कोठे पेरणे आवश्यक आहे याची गणना करणारे अल्गोरिदम वापरले होते.
त्यामुळे जेव्हा ते धान्य उगवले, तेव्हा अवकाशातून पाहिल्यास मेस्सीचा चेहरा दिसतो.
मेस्सी अर्जेंटिनाच्या या विश्वविजयाचा नायकही ठरला. त्याने फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत 7 गोल केले होते.
तसेच मेस्सीने अंतिम सामन्यात देखील महत्त्वपूर्ण दोन गोल केले होते.
त्यामुळे मेस्सीने या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला गोल्डन बॉलचा पुरस्कारही जिंकला होता.