Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (23 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला क्वालिफायर सामना झाला.
पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 15 धावांनी विजय मिळवत थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला.
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही दहावी वेळ ठरली आहे.
चेन्नईने यापूर्वी 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.
चेन्नईने यापूर्वी खेळलेल्या 9 अंतिम सामन्यांपैकी 2010, 2011, 2018 आणि 2021 यावर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
चेन्नईने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सला, 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला, 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादला आणि 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद जिंकले आहे.
चेन्नईने सर्वाधिकवेळा मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारला आहे. चेन्नईने 2013, 2015 आणि 2019 या तीन वर्षी चेन्नईला मुंबई इंडियन्सने पराभूत केले आहे.
चेन्नईला 2008 साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध, 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.