Pramod Yadav
सत्तरी तालुक्यातील करंझोळ येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानचा पारंपारिक चोरोत्सव रविवारी रात्री उत्साहात साजरा करण्यात आला.
गोव्यातील पारंपारिक कलेचा जोशपूर्ण असा हा उत्सव सत्तरी तालुक्यातील करंझोळ गावांमध्ये शेकडो वर्षापासून साजरा करण्यात येत आहे.
चोरोत्सव व्रत पाळणारे आठ गडे यामध्ये सहभागी झाले होते. पैकी चार गडे डोक्याने तर चार कमरेने जमिनीत पुरण्यात आले होते.
तर एक सुवारी दुसरा मुड्डयाचा चोर असे चित्र दाखविण्यात आले होते.
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा नारा देत हा चोरोत्सव साजरा करण्यात आला.
करंझोळ सातेरी ब्राह्मणी देवीचे दोन तर कुमठोळ येथील देवीचा 1 घोडा घोडेमोडणीत रात्री उशिरापर्यंत गावच्या मांड्यावर साजरी करण्यात आली.
याठिकाणी गेल्यानंतर देवस्थानच्या मंदिरात सर्व गावुणग्य्याना विशेष सन्मान दिला जातो.
यावेळी तीर्थ देणे कुंकुमतिलक लावणे व व इतर स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
उत्कंठापूर्वक सोहळा पाहण्यासाठी शेकडो नागरिक खास करून उपस्थित होते.