गोमन्तक डिजिटल टीम
गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आणि आदिवासी महिला मंच वतीने खोतीगाव येथे रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
खोतीगाव परिसरात महिलांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा खाद्य महोत्सव आयोजित केला गेला.
या आदिवासी खाद्य महोत्सवात महिलांनी असंख्य प्रकारच्या रानभाज्या तयार करून आणल्या होत्या.
उरपुले भाजी, तेनया भाजी, मर तेनया भाजी, कायरा, एक पाना भाजी, कान्ना भाजी, कातले भाजी, मोरशेंडा यासारख्या रानभाज्या महोत्सवात होत्या.
याशिवाय पाती भाजी, तायकिळो, कुडूकेची भाजी, तेरों, पाल्या भाजी, किल्लं, फागला या भाज्यांचा देखील समावेश होता.
महिलांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म परीक्षकांना समजावून सांगितले.
पणजी -आजी -आई या पिढ्यांच्या हातातून तयार झालेल्या पाककृती घरातील पुढची पिढी जतन तर करत आहे.
खोतीगावातील महिलांनी बनवलेले पदार्थ हे त्यांच्या समृद्ध आणि पौष्टिक खाद्य परंपरेचा वारसा जपणारे होते.