IND vs SL: श्रीलंकन कॅप्टनने हिरावला हिटमॅनचा 'अव्वल क्रमांक'

गोमन्तक डिजिटल टीम

वानखेडे स्टेडियमवर 3 जानेवारीला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी20 सामना झाला.

Dasun Shanaka | Dainik Gomantak

या सामन्यात खेळताना श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला आहे.

Dasun Shanaka | Dainik Gomantak

शनकाने या सामन्यात सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

Dasun Shanaka | Dainik Gomantak

त्यामुळे शनका आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 21 षटकारांसह अव्वल क्रमांकावर आला आहे.

Dasun Shanaka | Dainik Gomantak

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शनकाने रोहित शर्माच्या 19 षटकारांना मागे टाकले आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

या यादीत 14 षटकारांसह कुशल परेरा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Kusal Perera | Dainik Gomantak

शिखर धवन 12 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

युवराज सिंग 11 षटकारांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Yuvraj Singh | Dainik Gomantak
Shubman Gill | Dainik Gomantak