Rahul sadolikar
साथ निभाना साथिया फेम गोपी बहू अर्थात देवोलिना भट्टाचार्जीला तिचे चाहते कसे विसरतील. मालिकांमधुन प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारी देवोलिना गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीपासून दूर होती
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच एका मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर देवोलिनाचे चाहते तिच्या भूमीकेबद्दल उत्सुक असणार आहेत.
'साथ निभाना साथिया' मालिकेतून देवोलिनाने आपली ओळख निर्माण केली होती. तिच्या गोपी या व्यक्तिरेखेने घराघरात प्रसिद्ध झाली होती. ती 'बिग बॉस 15' मध्येही दिसली. तिने काही महिन्यांपूर्वीच शानवाज शेखसोबत लग्न केले.
देवोलिना 10 वर्षांच्या लीपनंतर 'दिल दिया गल्ला'चा भाग होणार आहे. लीप म्हणजे ही मालिका आता 10 वर्षांनी पुढे जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नव्या या नव्या पर्वात देवोलिना भट्टाचार्जी दिशा या संगीत शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे.
शोमधील आपल्या नव्या भूमीकेबद्दल बोलताना देवोलीना म्हणाली की ती या शोचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. एका संवादात तिने सांगितले 'हृदयस्पर्शी शोचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे.
शोमध्ये आलिया ही अमृता आणि वीर यांची मुलगी आहे. आलियाला जन्म देताना अमृताचा मृत्यू झाला. यामुळे वीर मुलापासून विभक्त होतो.