Cricket मधील आठ प्रकारचे Duck माहित आहेत का?

Pranali Kodre

क्रिकेटमध्ये डक ही कोणत्याही फलंदाजाला न आवडणारी, तर गोलंदाजाला हवीहवीशी गोष्ट आहे.

Cricket Duck | Dainik Gomantak

याचे कारणी अगदी सरळ आहे जेव्हा फलंदाज एकही धाव न करता शुन्यावर आऊट होतो, तेव्हा तो डक आऊट झाला असं म्हटलं जातं.

Cricket Duck | Dainik Gomantak

क्रिकेटमधील या डकचे एकूण 8 प्रकार आहेत.

Cricket Duck | Dainik Gomantak

१. गोल्डन डक - जेव्हा फलंदाज त्याचा पहिलाच अधिकृत चेंडूचा सामना करताना बाद होतो, तेव्हा त्याला गोल्डन डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

2. सिल्व्हर डक - जेव्हा फलंदाज त्याचा दुसरा अधिकृत चेंडूचा सामना करताना शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला सिल्व्हर डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

3. ब्राँझ डक - जेव्हा फलंदाज त्याचा तिसरा अधिकृत चेंडूचा सामना करताना शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला ब्राँझ डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

4. डायमंड डक - जेव्हा फलंदाज कोणत्याही अधिकृत चेंडूचा सामना न करता शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला डायमंड डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

5. रॉयल डक - जेव्हा सलामीवीर फलंदाज संघाच्या डावाच्या सर्वात पहिल्या चेंडूवर बाद होतो, तेव्हा त्याला रॉयल डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

6. लाफिंग डक - जेव्हा फलंदाज संघाच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला लाफिंग डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

7. पेअर डक - जेव्हा फलंदाज कसोटी सामन्याच्या किंवा प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही डावात शुन्यावर बाद होतो, तेव्हा पेअर डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

8. किंग पेअर डक - जेव्हा फलंदाज कसोटी सामन्याच्या किंवा प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही डावात त्याचा पहिलाच अधिकृत चेंडूचा सामना करताना बाद होतो, तेव्हा त्याला किंग पेअप डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak