Shikhar Dhawan च्या 'या' 5 खास गोष्टी माहितीयं का?

Pranali Kodre

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनचा जन्म 5 डिसेंबर 1985 रोजी दिल्ली येथे झाला.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

त्याने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे शिखरने सुरुवातील यष्टीरक्षक म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, पण नंतर त्याने केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वयोगटातील क्रिकेट गाजवले आहे. त्याने 2004 सालच्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 505 धावा केल्या होत्या. आजही तो एका 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

शिखरने 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण तो शुन्यावरच बाद झाला. मात्र, त्याने नंतर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी पदार्पण करत शतकी खेळीसह पहिला सामना गाजवला.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

शिखरने पदार्पणाच्या कसोटीत 85 चेंडूतच शतक झळकावले होते. त्यामुळे तो पदार्पणाच्या कसोटीत सर्वात जलद शतक ठोकणारा फलंदाज ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

तसेच शिखर कसोटीत पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकच्या आधी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

इतकंच नाही, तर तो आयसीसीच्या वनडे स्पर्धांमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणाराही फलंदाज आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

त्याने आयपीएलमध्ये सलग दोन शतके करणारा पहिला खेळाडू होण्याचा मानही मिळवला आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

शिखरला 2021 साली अर्जून पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. शिखरने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 267 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 24 शतके आणि 55 अर्धशतकांसह 10856 धावा केल्या आहेत.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak
Dainik Gomantak