अमित मिश्रा ते रोहित शर्मा IPL मध्ये Hat-Trick घेणारे 18 गोलंदाज

Pranali Kodre

हॅट्रिक घेणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी कामगिरी असते.

Amit Mishra | Dainik Gomantak

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 18 खेळाडूंनी विकेटची हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

Jaydev Unadkat | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे यात सध्याचा भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. त्याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

Rohit Sharma | Dainik Gomantak

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा अमित मिश्राने केला असून त्याने आत्तापर्यंत एकूण 3 हॅट्रिक घेतल्या आहेत.

Amit Mishra | Dainik Gomantak

तसेच युवराज सिंगने 2 वेळा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली असून त्याने या दोन्ही हॅट्रिक 2009 मध्येच घेतल्या होत्या.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

आयपीएलमध्ये रोहितव्यतिरिक्त अजित चंडेला, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल,प्रविण कुमार, प्रविण तांबे, लक्ष्मीपती बालाजी, श्रेयस गोपाळ, हर्षल पटेल आणि जयदेव उनाडकट या भारतीय खेळाडूंनी प्रत्येकी एक वेळा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे.

Yuzvendra Chahal | Dainik Gomantak

तसेच सुनील नारायण, मखया एन्टीनी, सॅम्युएल्स बद्री, शेन वॉटसन, अँड्र्यू टाय आणि सॅम करन या परदेशी खेळाडूंनी प्रत्येकी एकदा हॅट्रिक घेतली आहे.

Shane Watson | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे सॅम करन आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे.

Sam Curran | Dainik Gomantak

सॅम करनने पंजाब किंग्सकडून खेळताना त्याचे वय 20 वर्षे आणि 302 दिवस असताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

Sam Curran | Dainik Gomantak
Team India | Dainik Gomantak