गोव्यातल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये; इथेच दिसतील 'या' गोष्टी

Kavya Powar

आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाची आपण सर्वचजण अगदी आतुरतेने वाट बघत असतो.

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

गोव्यासह कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातो

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

गोव्याच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये

गोव्यातील गणेशोत्सव इतर ठिकाणांपेक्षा जरा वेगळा असतो. चला तर जाणून घ्या गोव्याच्या गणेशोत्सवाची काही वैशिष्ट्ये

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

माटोळी

गोव्यात गणेशमूर्तीवर माटोळी बांधली जाते. ज्यामध्ये अनेक रानफुले, फळे आणि औषधी वनस्पतींचा समावेश असतो

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

गणेशोत्सव अपूर्णच

सणात माटोळीचं इतकं महत्व आहे की, माटोळीशिवाय गणेशोत्सव पूर्ण होऊच शकत नाही

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

घुमट वाद्य

मातीच्या मडक्याला घोरपडीची कातडी बांधून तयार केलेल 'घुमट वाद्य' गोव्यातील गणेशोत्सवाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

घुमट आरती

गणेशोत्सवात अगदी रोज न चुकता 'घुमट आरती' केली जाते

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

नेवऱ्या

गणेश चतुर्थीत गोव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट नेवऱ्या बनवल्या जातात.

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

कंदमूळ

ऋषिपंचमी दिवशी गोव्यात कंदमुळांची भाजी केली जाते. ऋषी कंदमूळ खाऊन राहायचे; त्यामुळे त्यांच्या'स्मरणार्थ एक दिवस ही भाजी खाल्ली जाते

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak

पेटीतला गणपती/ कागदाचा गणपती

गोव्यावर जेव्हा पोर्तुगीजांचे राज्य होते, तेव्हा देवतांची पूजा करण्यास सक्त मनाई होती. यावेळी गणेशोत्सवात गोव्यातील काही ठिकाणी पोर्तुगीजांपासून लपून कागदावर गणपती रेखाटून किंवा गणपती पेटीत ठेऊन पूजा केली जात असे

Ganesh Festival in Goa | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak