IFFI Goa 2022: गोवा झगमगतोय 'इफ्फी' च्या शुभारंभात..

दैनिक गोमन्तक

भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात आजपासून सुरुवात होत आहे. 

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

गेल्या दोन वर्षानंतर चित्रपट महोत्सव होणार असून, चित्रपट महोत्सवात 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

देशभरातील 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यात मराठी, कोकणीसह अन्य भाषांतील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

महोत्सवाचे उदघाटन संध्याकाळी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

Pramod Sawant | Sreedharan Pillai | Dainik Gomantak

तसेच, बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन, सुनील शेट्टी, प्रभू देवा, परेश रावल, सारा अली खान, अमृता खानविलकर आदी स्टार्स उदघाटनावेळी उपस्थित राहणार आहेत.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

महोत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Narendra Modi | Droupadi Murmu | Dainik Gomantak

ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या ‘अल्मा ॲण्ड ऑस्कर’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

तसेच, यंदा प्रथमच या महोत्सवाचा आनंद गोवा राज्यातील जनतेला देखील घेता येणार आहे.

IFFI Goa 2022 | Dainik Gomantak

आज सकाळीच प्रमोद सावंतांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्धाटनाच्या तयारीची पाहणी केली आहे.

Pramod Sawant | Dainik Gomantak

अनुराग ठाकुर हे गोव्यात दाखल झाले असून, त्यांचे एयरपोर्टवर विभागीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

Anurag Thakur | Dainik Gomantak
Dainik Gomantak