पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविणारा इंजिनीयर

Vinayak Samant

मांद्रे गावातील युवा इंजीनियर

संकेत मांद्रेकर हा मेकॅनिकल इंजिनीयरिंग केलेला तरुण मांद्रे गावात रहातो. गेली सहा वर्षे तो पर्यावरणपूरक मूर्ती घडवितोय.

Sanket Mandrekar | Dainik Gomantak

स्वतःच्या आवडीचे व्यवसायात रूपांतर

इंजिनीयरिंग केलेल असूनही आपली आवड जपत व्यवसायाला सुरवात केली. त्यातच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती करण्याचे त्याला सुचले.

Sanket Mandrekar | Dainik Gomantak

प्लास्टर ऑफ पॅरिसला शोधला पर्याय

प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्तींची विसर्जनावेळी होणारी विटंबना पाहून दरवर्षी एकही रासायनिक रंग न वापरता पूर्णपणे चिकण मातीची मूर्ती बनविण्याचा त्याने ध्यास घेतला.

Sanket Mandrekar | Dainik Gomantak

कडधान्यांचा वापर करून घडविली गणेशमूर्ती

घरात वापरले जाणारे कडधान्य, गहू, तांदूळ, लाकडाचा भुसा अशाप्रकारच्या वस्तु वापरुन पहिल्यांदा स्वतःच्या घरातील गणपती संकेतने बनविला.

Sanket Mandrekar | Dainik Gomantak

स्वतः बनला उदाहरण

आपल्या घरातील गणेशमूर्ती पाहून इतरांनी देखील पर्यावरणपूरक गणपती घरात पूजेसाठी आणावा हा त्याचा निव्वळ हेतु आहे.

Eco-freindly Ganapati | Dainik Gomantak

संकेतच्या अनोख्या गणेशमूर्तीची चर्चा

संकेत ने बनविलेली अनोखी आणि सुंदर गणेशमूर्ती पाहून आजूबाजूच्या लोकांनी देखील त्याला आपल्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची विनंती केली.

Eco-freindly Ganapati | Dainik Gomantak

सहा वर्षांचा प्रवास

सहा वर्षांपूर्वी एक गणेशमूर्तीपासून सुरु केलेले हे पर्यावरण रक्षणाचे अभियान आज १६ मूर्तीपर्यन्त पोहोचले आहे.

Eco-freindly Ganapati | Dainik Gomantak
Goa govt Phd stipend | Dainik Gomantak