Ganeshprasad Gogate
निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कॅमेरा, ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील नकाशा तसेच ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
या सगळ्यासोबतच प्राथमिक औषधोपचाराची साधने देखील आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. अंगदुखी, ताप, सर्दी अशा आजारांवरही औषधे जवळ ठेवावी.
ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी पर्यटनाला जाताना त्या दिवशी संबंधित ठिकाणी जाण्यास बंदी तर नाही ना किंवा आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकतो की नाही? याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
आपण पर्यटनाला कोणत्या ऋतुमध्ये जात आहोत तसेच कोणत्या ठिकाणी व किती दिवसांसाठी जात आहोत, यानुसार कपडे व सोबत घेऊन जाणाऱ्या साहित्याची निवड करणे आवश्यक आहे.
काश्मीर किंवा लडाखसारख्या अतिशीत प्रदेशात जाताना हातमोजे, पायमोजे सोबत घेऊन जाणे व ते आपल्यासोबत असलेल्या छोट्या बॅगमध्येच असणे आवश्यक असते.
गाडी, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जर आपण सोबत ठेवणार असू तर त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था होईल याचीही पडताळणी करून ठेवावी.