दैनिक गोमन्तक
सुपारीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.
सुपारीचे चूर्ण, काढा, पेस्ट वापरून वेगवेगळ्या आजारांत उपचाराकरता औषधांमध्ये त्याची योग्य मात्रा रुग्णांना दिली जाते.
वातावरणामधील उष्णता वाढली की लोकांचे तोंडे येते व ओठांच्या व तोंडाच्या आत पांढरे फोड व चट्टे येऊ लागतात.
कधीकधी लालसरपणा देखील येतो व खाणे पिणे बंद होण्याची वेळ येते.
आयुर्वेदामध्ये तोंड येण्यावर सुपारीचे सेवन करणे हा उपाय सांगितला आहे.
महिलांनादेखील मासिक पाळीसंबंधी दुखण्यांमध्ये सुपारीचा औषधी वापर सांगितला आहे.
उलटी,मळमळ,खोकला यांसाठी सुपारीचे योग्य प्रमाणात सेवन करणे आयुर्वेदामध्ये लाभदायी सांगितले आहे.