Hockey World Cup: सेलिब्रेटिंच्या उपस्थितीत डोळे दिपवणारा उद्घाटन सोहळा

Pranali Kodre

भारतातील ओडिशा राज्यात 13 ते 29 जानेवारी 2022 दरम्यान हॉकी वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे.

Hockey World Cup 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

या वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा 11 जानेवारीला अनेक मान्यवरांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत कटकमधील बाराबाती स्टेडियमवर संध्याकाळई पार पडला.

Hockey World Cup 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

या उद्घाटन सोहळ्यासाठी स्टेडियममध्ये जवळपास 50 हजारांहून अधिक हॉकी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

Hockey World Cup 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

हॉकी वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरशनचे अध्यक्ष तायाब इक्रम, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Hockey World Cup 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ओडिशाची आणि भारताची संस्कृती दाखवणारे काही परफॉर्मन्स झाले.

Hockey World Cup 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

तसेच ओडिशामधील सेलिब्रेटी स्निती मिश्रा, रितुराज मोहंती, लिसा मिश्रा यांच्यासह अनेक सेलिब्रेटिंचेही परफॉर्मन्स पाहायला मिळाले.

Rituraj Mohanty | Dainik Gomantak

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्याबरोबरच प्रसिद्ध ब्लॅकस्वान ग्रुपच्या परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधले.

Ranveer Singh | Dainik Gomantak

संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हॉकी वर्ल्डकपचे थीम साँगही यावेळी स्थानिक कलाकार आणि गायकांनी गायले. कार्यक्रमासाठी प्रीतम देखील उपस्थित होते.

Pritam Chakraborty | Dainik Gomantak

इतकेच नाही, तर संपूर्ण शहरात 16 ठिकाणी फॅन पार्कही उभे करण्यात आले होते. त्यामुळे त्यावरूनही चाहत्यांनी उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेतला.

BLACKSWAN girl group | Dainik Gomantak

या वर्ल्डकपमध्ये 16 संघ सहभागी होणार असून त्यांच्यासाठी वर्ल्डकप व्हिलेजही तयार करण्यात आले आहे.

Birsa Munda Hockey Stadium | Dainik Gomantak

भारतात सलग दुसऱ्यांदा हॉकी वर्ल्डकप खेळवला जात आहे. याआधी 2018 ला देखील भारतात वर्ल्डकप खेळवण्यात आला होता.

Hockey World Cup 2023 | Dainik Gomantak
Hockey World Cup | Dainik Gomantak