शरीरात 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा, तुम्हाला असू शकते 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता

Ganeshprasad Gogate

केस गळणे : केसगळतीमुळे त्रस्त लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.

Deficiency of 'Vitamin D' | Dainik Gomantak

थकवा आणि अशक्तपणा : व्हिटॅमिन डी ऊर्जा चयापचयमध्ये महत्वाची भूमिका बजावते. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

Deficiency of 'Vitamin D' | Dainik Gomantak

नैराश्याची भावना : व्हिटॅमिन डी ला 'सनशाईन व्हिटॅमिन' असेही म्हणतात. कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागतं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळा लोकांमध्ये नैराश्याची समस्या दिसून येते.

Deficiency of 'Vitamin D' | Dainik Gomantak

स्नायू दुखणे आणि जळजळ होणे : व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, जळजळ होणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. विशेषत: वृद्ध लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं.

Deficiency of 'Vitamin D' | Dainik Gomantak

हाडांची झीज होणे : हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर हाडांना इजा होऊ शकते, ज्यामुळे किरकोळ जखमा होऊनही फ्रॅक्चरचा धोकाही वाढतो.

Deficiency of 'Vitamin D' | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak