Pranali Kodre
भारताकडून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 6 खेळाडूंनी शतके केली आहेत.
भारताकडून सर्वाधिक 4 आंतरराष्ट्रीय टी20 शतके रोहित शर्माने केली आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने आत्तापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय टी20 शतके केली आहेत.
तसेच दोन आंतरराष्ट्रीय टी20 शतकांसह केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याशिवाय दीपक हुडा, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताकडून प्रत्येकी 1 आंतरराष्ट्रीय टी20 शतक केले आहे.
भारताकडून सर्वात आधी सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय टी20 शतक करण्याचा कारनामा केला होता.
दरम्यान, भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोच्च नाबाद 122 धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.