International Cricket मध्ये सर्वाधिक धावा करणारे 7 भारतीय क्रिकेटर

Pranali Kodre

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी दरम्यान 17 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावा करणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 438 सामन्यांमध्ये 42.85 च्या सरासरीने 17014 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 664 सामन्यांमध्ये 48.52 सरासरीने 34357 धावा केल्या आहेत.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 25233 धावांसह विराट कोहली आहे. विराटने या धावा 494 सामन्यांमध्ये 53.68 सरासरीने केल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 509 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 45.41 सरासरीने 24208 धावा केल्या आहेत.

Rahul Dravid | Dainik Gomantak

सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 424 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 41.46 सरासरीने 18575 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly | Dainik Gomantak

या यादीत पाचव्या क्रमांकावर 17266 धावांसह एमएस धोनी आहे. त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44.96 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

MS Dhoni | Dainik Gomantak

विरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 374 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 40.31 च्या सरासरीने 17253 धावा केल्या आहेत.

Virender Sehwag | Dainik Gomantak
Team India | Dainik Gomantak