IPL सोडाच पण Joe Root च्या संपूर्ण करियरशीच भारताचं स्पेशल कनेक्शन

Pranali Kodre

आयपीएल 2023 मध्ये 7 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात जयपूरला सामना पार पडला.

RR vs SRH | Twitter

या सामन्यातून जो रुटचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. त्याने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केले.

Joe Root | Twitter

विशेष गोष्ट अशी की जो रुटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 पदार्पणही भारतातच झाले आहे.

Joe Root | Twitter

जो रुटने कसोटी, वनडे आणि टी20 पदार्पण फक्त भारतातच नाही, तर भारतीय संघाविरुद्धच खेळताना केले आहे.

Joe Root | Twitter

इंग्लंडने 2012-13 मध्ये भारत दौरा केला होता. त्याच दौऱ्यात रुटचे तिन्ही प्रकारात पदार्पण झाले होते.

Joe Root | Twitter

जो रुटने डिसेंबर 2012 मध्ये नागपूरला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Joe Root | Twitter

त्यानंतर त्याने 22 डिसेंबर 2012 रोजी त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते.

Joe Root | Twitter

जानेवारी 2013 मध्ये जो रुटला वनडे पदार्पणाचीही संधी मिळाली. त्यावेळी त्याने राजकोटला 11 जानेवारी 2013 रोजी झालेल्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते.

Joe Root | Twitter
Virat Kohli | Dainik Gomantak