BS Chandrasekhar: अपंगत्वालाच ताकद बनवत फलंदाजांना नाचवणारा भारतीय गोलंदाज

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट गाजवणारा गोलंदाज

साठ आणि सत्तरच्या दशकात भारतीय क्रिकेट गाजवणारा एक गोलंदाज म्हणजे भागवत चंद्रशेखर.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

फिरकीची जादू

भागवत चंद्रशेखर यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या फिरकीने अनेक दिग्गज फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडले होते.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

अपंगत्वालाच बनवली ताकद

विशेष म्हणजे लहानपणी पोलिओमुळे त्यांच्या उजव्या हाताला अपंगत्व आले होते. पण याच अपंगत्वाला त्यांनी त्यांची ताकद बनवले आणि त्याचा फायदा घेत आपली गोलंदाजी शैली विकसित केली.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

आदर्श

म्हैसूरमध्ये जन्मलेल्या पण बंगळुरूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या चंद्रशेखर यांचे रिची बेनॉड आदर्श होते.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

कसोटी विकेट्स

चंद्रशेखर यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 58 सामन्यांमध्ये 242 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्यांनी फलंदाजी करताना केलेल्या धावांपेक्षा (167) त्यांच्या विकेट्सची संख्या जास्त आहे.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

1000 हून अधिक विकेट्स

चंद्रशेखर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 246 प्रथम श्रेणी सामने खेळताना तब्बल 1063 विकेट्स घेतल्या आहेत.

Bhagwath Chandrasekhar | Twitter

डक आऊट

चंद्रशेखर हे कसोटी कारकिर्दीत 23 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

Ajit Wadekar and Bhagwath Chandrasekhar | Twitter

पुरस्कार

त्यांना 1972 साली विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळालेला

Bhagwath Chandrasekhar | Twitter
Ravindra Jadeja and Rivaba Jadeja with PM Narendra Modi | Dainik Gomantak