IPL मध्ये सर्वात वेगवान फिफ्टी ठोकणारे 5 फलंदाज

Pranali Kodre

आयपीएल 2023 मध्ये 11 मे रोजी राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली.

Yashasvi Jaiswal - Sanju Samson | Dainik Gomantak

जयस्वालचे विक्रमी अर्धशतक

जयस्वालने नाबाद 98 धावांच्या खेळीदरम्यान 13 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

जयस्वालचा आयपीएल विक्रम

जयस्वालने 13 चेंडूत अर्धशतक केल्याने तो आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

Yashasvi Jaiswal | Twitter

यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर होता.

KL Rahul | Twitter

केएल राहुल

केएल राहुलने 8 एप्रिल 2018 रोजी पंजाब किंग्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते.

KL Rahul | Twitter

पॅट कमिन्स

पॅट कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 एप्रिल 2022 रोजी 14 चेंडूत अर्धशतक केले होते.

Pat Cummins | Twitter

युसूफ पठाण

24 मे 2014 रोजी कोलकाता नाईट रायडर्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना युसूफने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

Yusuf Pathan | Twitter

सुनील नारायण

सुनील नारायणनेही कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतानाच 7 मे 2017 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलेले.

Sunil Narine | Twitter

निकोलस पूरन

आयपीएल 2013 मध्ये 10 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध निकोलस पूरनने 15 चेंडूत अर्धशतक केले होते.

Nicholas Pooran | Twitter
Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak