WPL 2023: हरमनप्रीत ते मानधना, 'या' 5 खेळाडू सांभाळणार कॅप्टन्सी

Pranali Kodre

महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

या पहिल्या - वहिल्या हंगामाची बीसीसीआयने जोरदार तयारी केली असून अनेक सेलिब्रेटी उद्घाटन सोहळ्याला उपस्थितीही लावणार आहेत.

WPL 2023 | Dainik Gomantak

तसेच या हंगामात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे 5 संघ खेळताना दिसणार आहेत.

WPL 2023 | Dainik Gomantak

दरम्यान, या पाचही संघांनी त्यांच्या संघाच्या कर्णधारांची नावे हंगाम सुरु होण्यापूर्वी घोषित केली आहेत.

Meg Lanning | Dainik Gomantak

मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धूरा भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या हरमनप्रीत कौरकडे सोपवली आहे.

Harmanpreet Kaur | Dainik Gomantak

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची ५ वेळची विश्वविजेती कर्णधार मेग लॅनिंग करताना दिसणार आहे.

Meg Lanning | Dainik Gomantak

युपी वॉरियर्स संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीकडे सोपवण्यात आले आहे.

Alyssa Healy | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज फलंदाज बेथ मूनी या डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात गुजरात जायंट्सने कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.

Beth Mooney | Dainik Gomantak
WPL 2023 | Dainik Gomantak