गोमंतक ऑनलाईन टीम
दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला.
ह्योजॉन्ग मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली.
त्यानंतर भारतात प्रसिद्धस आलेली ह्योजॉन्ग हीने नुकतीच गोव्याला भेट दिली.
दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग गोव्याच्या प्रेमात पडली आहे.
तिने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याची निवड केली.
गोवा भेटीत तिने विविध ठिकाणांना भेट दिली व निसर्गाचा आस्वाद घेतला.
ह्योजॉन्गने आपल्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील एक व्हिडिओ आणि विविध फोटो शेअर केले आहेत.