Veer Mahaan: WWE मधील भारताचा 'वीर महान'

प्रमोद यादव

WWE मध्ये भारताचा पहिला पैलवान म्हणून 'द ग्रेट खली' याच्यानंतर, 'वीर महान' या नव्या पैलवानाचा समावेश झाला आहे.

Veer Mahaan | Instagram

वीर महानचा अस्सल भारतीय लूक, त्याची स्टाईल यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Veer Mahaan | Instagram

वीर महानचं खरं नाव रिंकू सिंग राजपूत. उत्तर प्रदेशच्या रविदास नगर जिल्ह्यातील गोपीगंज येथे 8 ऑगस्ट 1988 रोजी त्याचा जन्म झाला.

Veer Mahaan | Instagram

शालेय जीवनात रिंकू सिंग भालाफेक या खेळात सहभाग घ्यायचा, रिंकूने भालाफेकीत ज्युनियर नॅशनल पदकही पटकावलं आहे.

Veer Mahaan | Instagram

अमेरिकेत प्रोफेशनल बेसबॉलमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणूनही रिंकू सिंगच्या नावाची नोंद झाली आहे.

Veer Mahaan | Instagram

2018 मध्ये मात्र रिंकू सिंगने बेसबॉलला रामराम ठोकून WWE सोबत पहिल्यांदा करार केला.

Veer Mahaan | Instagram

वीर महानची उंची 6 फूट 4 इंच, तर वजन 125 किलो आहे. 4 एप्रिल 2022 रोजी वीर महानने WWE - रॉ मध्ये पदार्पण केलं

Veer Mahaan | Instagram
Web Story | Dainik Gomantak