MS Dhoni: 'कॅप्टनकूल'ची 16 वर्षे

Pranali Kodre

यशस्वी कर्णधार

भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो.

MS Dhoni | Twitter

आयपीएल

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसतो.

MS Dhoni | Twitter

कॅप्टनकूल

धोनीला त्याच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे कॅप्टनकूल म्हणूनही ओळखले जाते.

MS Dhoni | Twitter

16 वर्षांपूर्वी सुरुवात

धोनीने सर्वात आधी कर्णधार म्हणून 16 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती.

MS Dhoni | Twitter

पहिला सामना

धोनीने सर्वात आधी भारतीय संघाचे नेतृत्व 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध केले होते.

MS Dhoni | Twitter

पहिले विजेतेपद

विशेष म्हणजे धोनीने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करताना 2007 साली विश्वविजेतेपदालाही गवसणी घातली होती.

MS Dhoni | Twitter

कसोटी क्रिकेट

धोनीने तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 2008 ते 2014 दरम्यान 60 सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 27 विजय आणि 18 पराभव पत्करले. तसेच 15 सामने अनिर्णित राहिले.

MS Dhoni | Twitter

वनडे क्रिकेट

धोनीने 200 वनडेत भारताचे नेतृत्व केले. तो 200 वनडेत नेतृत्व करणारा रिकी पाँटिंगनंतरचा दुसराच कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून वनडेत 110 विजय आणि 74 पराभव पाहिले. तसेच 5 सामने बरोबरीत सुटले, तर 11 सामन्यांचा निकाल लागला नाही.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय टी20

धोनीने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व करताना 41 विजय आणि 28 पराभव स्विकारले. 1 सामना बरोबरीत सुटला, तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.

MS Dhoni | Virat Kohli | Twitter

आयपीएल कॅप्टन्सी

आयपीएलमध्ये धोनीने 227 सामन्यात नेतृत्व करताना 133 विजय मिळवले आहेत. तसेच 91 सामन्यात पराभव स्विकारला असून 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

MS Dhoni | Twitter

महत्त्वाची विजेतीपदे

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2010 आणि 2016 आशिया चषक, 2010-2011 कसोटीतील अव्वल क्रमांकाची गदा अशा महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत.

MS Dhoni | Twitter

चेन्नई सुपर किंग्सची विजेतीपदे

तसेच धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले, तर 2010 आणि 2014 साली चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली.

MS Dhoni | Twitter
Suryakumar Yadav | Dainik Gomantak