Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
त्यामुळे या हंगामाची तयारी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने सुरु केली आहे.
सीएसके संघातील अनेक खेळाडू सराव शिबिरासाठी चेन्नईत जमले असून संघाचा कर्णधार एमएस धोनीचाही यात समावेश आहे.
धोनीनेही आगामी आयपीएल हंगामासाठी सराव सुरू केला असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सीएसकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या व्हिडिओंमध्ये धोनी नेट्समध्ये मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहे.
धोनीच्या चौकार-षटकार मारण्याच्या या व्हिडिओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.
दरम्यान, सध्या अशीही चर्चा आहे की हा धोनीचा कारकिर्दीतील अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो.
या हंगामात सीएसके संघ घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर 3 वर्षांनंतर सामने खेळताना दिसणार आहे.
सीएसके संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएल हंगामात धोनीने नेतृत्व केले आहे.
धोनीच्या नेतृत्वाच सीएसकेने चारवेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.