IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक कारनामा

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत ९ मे रोजी मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध तब्बल 21 चेंडू राखून 6 विकेट्सने विजय मिळवला.

MI vs RCB | Dainik Gomantak

मुंबईचा विजय

या सामन्यात बेंगलोरने मुंबईसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

MI vs RCB | Dainik Gomantak

तिसऱ्यांदा 200 पार

आयपीएलच्या 16 व्या हंगामात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान मुंबईने तिसऱ्यांदा यशस्वी पूर्ण केले.

Suryakumar Yadav - Nehal Wadhera | Dainik Gomantak

मुंबई विक्रमी विजय

एकाच आयपीएल हंगामात तीन वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पार करणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

यापूर्वी पंजाब किंग्सने 2014 साली आणि चेन्नई सुपर किंग्सने 2018 साली प्रत्येकी दोन वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पार केले होते.

Chennai Super Kings | Dainik Gomantak

त्याचबरोबर 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.

Mumbai Indians | Dainik Gomantak

यापूर्वी 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग सर्वाधिक चेंडू राखून पूर्ण करण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर होता. त्यांनी 2017 साली गुजरात लायन्सविरुद्ध 208 धावांचे आव्हान 15 चेंडू राखून पूर्ण केले होते.

Delhi Capitals | Dainik Gomantak
Nehal Wadhera | Dainik Gomantak