Naomi Osaka: ग्रँडस्लॅम चॅम्पियन ओसाकाने दिली 'गुडन्यूज'

Pranali Kodre

जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाका हिने बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सर्वांना चकीत केले.

Naomi Osaka | Dainik Gomantak

तिने ती लवकरच आई होणार असल्याचे या पोस्टमधून सांगितले.

Naomi Osaka | Dainik Gomantak

याच कारणामुळे 25 वर्षीय ओसाका 2023 वर्षात टेनिस कोर्टवर दिसणार नाही.

Naomi Osaka | Dainik Gomantak

ओसाकाने गुडन्यूज देताना तिच्या सोनोग्राफीचा फोटो देखील शेअर केला आहे.

Naomi Osaka | Dainik Gomantak

तिने तिच्या पोस्टला 'कोर्टवर परत येण्यासाठी उत्सुक आहे, पण 2023 साठी एक छोटी अपडेट आहे,' असे कॅप्शन दिले आहे.

Naomi Osaka Pregnancy | Dainik Gomantak

ओसाकाने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतून माघार घेतली होती, पण तिने कारण सांगितले नव्हते.

Naomi Osaka | Dainik Gomantak

मात्र, तिने बुधवारी पोस्टमधून दिलेल्या गुडन्यूजने तिच्या माघार घेण्याचे कारण स्पष्ट झाले आहे.

Naomi Osaka

दरम्यान, ओसाकाने तिच्या पोस्टमधून हे देखील स्पष्ट केले की ती जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार आहे.

Naomi Osaka | Dainik Gomantak

ओसाकाने आत्तापर्यंत दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि दोन अमेरिकन ओपन असे एकूण चार ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली आहेत.

Naomi Osaka | Dainik Gomantak
Hockey World Cup 2023 | Dainik Gomantak