गोमन्तक डिजिटल टीम
प्रियंका चोप्राच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज सिटाडेलचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला आहे.
सिटाडेल सीरिज एक स्पाय थ्रिलर असून, खूप दिवसांपासून तिची चर्चा होत होती.
प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन यात एजंटची भूमिका करत आहेत.
इंग्रजी व्यतिरिक्त, ही वेब सिरीज हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील पाहता येईल.
अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर आणि अॅव्हेंजर्स एंडगेम बनवणाऱ्या रुसो ब्रदर्सने ही सीरिज दिग्दर्शित केली आहे.
सिटाडेल सीरिजमध्ये एका जागतिक गुप्तचर संस्थेची कथा दाखविण्यात आली आहे.
प्रियंका चोप्राची ही थ्रिलर वेब सीरीज 28 एप्रिलपासून अमॅझोन प्राईमवर पाहता येईल.