Ruturaj Gaikwad ने द्विशतकासह घातली 5 मोठ्या विक्रमांना गवसणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध 49 व्या षटकात सलग 7 षटकारासह 42 धावा ठोकल्या.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

या सामन्यात ऋतुराजने 159 चेंडूत 16 षटकार आणि 10 चौकारांसह 220 धावा केल्या.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

ऋतुराज एकाच षटकात सलग 7 षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Ruturaj Gaikwas | Dainik Gomantak

ऋतुराज लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा 11 वा भारतीय फलंदाज आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

तसेच तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा महाराष्ट्र संघाचा पहिलाच फलंदाज आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकाच षटकात 42 धावा ठोकणारा ऋतुराज पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचाही विक्रम आपल्या नावे केला आहे.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak

त्याने 16 षटकारांसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. रोहितने 2013 साली 209 धावांची खेळी करताना 16 षटकार ठोकले होते.

Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak