Shubman Gill: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे 5 भारतीय

Pranali Kodre

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रिकेट प्रकारात शतक करणे मोठी कामगिरी मानली जाते.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्यातही तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये करण्याचा कारनामा काही मोजक्या क्रिकेटपटूंनाच करता आला आहे.

Rohit Sharma and Shubman Gill | Dainik Gomantak

भारताचे असे पाच खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात किमान एक शतक केले आहे.

KL Rahul and Virat Kohli | Dainik Gomantak

न्यूझीलंडविरुद्ध १ फेब्रुवारी २०२३ रोजी अहमदाबादला झालेल्या टी२० सामन्यात शुभमन गिलने १२६ धावांची नाबाद खेळी केली.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्यामुळे शुभमन गिल तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला होता.

Shubman Gill | Dainik Gomantak

गिलने वनडेत 4, कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत प्रत्येकी १ शतक केले आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

भारताकडून सर्वात पहिल्यांदा तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करण्याची कामगिरी सुरेश रैनाने केली होती.

Suresh Raina | Dainik Gomantak

रैनाने वनडेत 5, कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी 1 शतक केले आहे.

Suresh Raina | Dainik Gomantak

तसेच रैनानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करण्याचा पराक्रम केला होता.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहितने आत्तापर्यंत वनडेत ३० शतके, कसोटीत ८ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ शतके केली आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करण्याच्या यादीत केएल राहुल देखील आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

केएल राहुलने आजपर्यंत कसोटीत ७ शतके, वनडेत ५ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २ शतके केली आहेत.

KL Rahul | Dainik Gomantak

त्याचबरोबर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा चौथा क्रिकेटपटू आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटने कसोटीत 27 शतके, वनडेत ४६ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १ शतक केले आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak
Novak Djokovic | Dainik Gomantak