Suryakumar Yadav मुंबई इंडियन्सकडून शतक करणारा पाचवाच खेळाडू

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 12 मे रोजी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 27 धावांनी विजय मिळवला.

Suryakumar Yadav | Twitter

मुंबईच्या विजयात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

Suryakumar Yadav | Twitter

सूर्यकुमारचे शतक

सूर्यकुमारने 49 चेंडूत 103 धावांची खेळी करताना 11 चौकार आणि 6 षटकार मारले.

Suryakumar Yadav | Twitter

मुंबईचा पाचवा शतकवीर

सुर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून शतक करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

सनथ जयसूर्या

मुंबई इंडियन्सकडून पहिले शतक सनथ जयसूर्याने केले होते. त्याने 14 मे 2008 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती.

Sanath Jayasuriya | Twitter

सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून 15 एप्रिल 2011 रोजी कोची टस्कर्स केरला विरुद्ध 100 धावांची खेळी केली होती.

Sachin Tendulkar | Twitter

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने तिसरे शतक केले होते. त्याने 12 मे 2012 रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 109 धावांची खेळी केली होती.

Rohit Sharma | Twitter

लिंडल सिमन्स

लिंडल सिमन्सने 21 मे 2014 रोजी मुंबई इंडियन्सकडून चौथे शतक केले होते. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 100 धावांची खेळी केली होती.

Lendl Simmons | Twitter
Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak