IND vs AUS: टीम इंडियासाठी 'सुपर मंडे'

Pranali Kodre

सोमवारी (13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला.

India vs Australia | Dainik Gomantak

चौथा कसोटी अनिर्णित राहिल्याने भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Team India | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळवलेला हा सलग चौथा कसोटी मालिका विजय ठरला आहे.

Border–Gavaskar Trophy 2023 | Dainik Gomantak

याशिवाय न्यूझीलंडने सोमवारीच श्रीलंका संघाविरुद्ध ख्राईस्टचर्च कसोटीत 2 विकेट्सने विजय मिळवल्याने भारतीय संघाचे कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या फायनलसाठी तिकीट पक्के झाले.

New Zealand vs Sri Lanka | Dainik Gomantak

श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेत भारताचे दुसरे स्थान पक्के झाले. त्यामुळे भारताचा फायनलमधील प्रवेश निश्चित झाला. मात्र, श्रीलंकेचे स्पप्न भंगले.

Team India | Dainik Gomantak

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच स्थान मिळवले आहे.

Australia Team | Dainik Gomantak

त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

India vs Australia | Dainik Gomantak

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 फायनल 7 ते 11 जून 2023 रोजी द ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

India vs Australia Test | Dainik Gomantak

भारताने कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे.

World Test Championship 2021 Final | Dainik Gomantak

यापूर्वी 2021 मध्ये देखील भारताने पहिल्यांदा कसोटी चॅम्पियनशीप फायनल खेळली होती. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

New Zealand WTC Final Winner 2021 | Dainik Gomantak
Mitchell Starc - Alyssa Healy | Dainik Gomantak