Akshay Nirmale
जवान हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमार दिग्दर्शित करत आहे. अॅटलीने यापुर्वी सुपरस्टार थलपती विजय याचे थेरी, मर्सल, बिगिल हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
जवानमध्ये अनेक सुप्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये प्रवेश करत आहे.
अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात मुख्य व्हिलनची भूमिका साकारत आहे. त्यामुळे चित्रपटात शाहरूख विरूद्ध विजय सेतुपती अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
सुपरस्टार विजय थलपती याच्यासोबत अॅटलीने खूप काम केले आहे. विजय थलपती जवान मध्येही कॅमियो साकारत आहे.
स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनदेखील या चित्रपटात कॅमियो साकारणार असल्याचे समजते.
अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये विनोदी भुमिकेत दिसलेला अभिनेता योगी बाबू जवान मध्येही काम करत आहे.
जवान चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.