गोव्यातील टॉप 5 घडामोडी

Priyanka Deshmukh

Goa सरकारचे लक्ष निवडणुकीकडे, कोरोना रुग्णांची संख्या हजाराकडे!गोव्यात सर्व काही खुले झाल्याचे कळताच देशी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी गोव्यात दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची तपासणी नाक्यावर तपासणी करणे शक्य होत नसल्याचेही कळते.

Covid-19 | Dainik Gomantak

तृणमूल कॉंग्रेसही गोव्याच्या राजकीय रिंगणात पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि कॉंग्रेसलाही रोखण्याच्या अनुभवाच्या ताकदीवर या पक्षाने तिसऱ्यांदा आपले राजकीय भवितव्य गोव्यात (Goa Election) आजमावण्याचे ठरवले आहे.

Trinamool Congress | Dainik Gomantak

वास्को पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला, गुरुवारी मध्यरात्री न्यू वडेम (New Vaddem) येथे टाकलेल्या छाप्यात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. विशिष्ट आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे वास्को पोलिसांनी न्यू वडेम येथील एका फ्लॅटवर छापा टाकला.

IPL Betting racket | Dainik Gomantak

दोन महिन्यांपूर्वी बाणावली (Banavali) येथे घडलेल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरविणाऱ्या बाणावली सामूहिक बलात्कार प्रकरणात (Banavali rape case) तपास करणाऱ्या पणजी महिला पोलिसांनी (Panajim Women Police) आज मडगाव न्यायालयात 4 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले.

Goa Rape Case | Dainik Gomantak

गोव्यातल्या फोंडयाचे पहिले आमदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर (Gajanan Raikar) 85 वर्षे, यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र पराग हे असून उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर | Dainik Gomantak