कॅप्टन शफालीचा U19 T20I World Cup सह भारी स्वॅग, पाहा फोटो

Pranali Kodre

भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने 29 जानेवारी 2023 रोजी 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.

U19 India Women Team | Dainik Gomantak

भारताच्या युवा संघाने 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला वर्लकपच्या अंतिम सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केले होते.

U19 India Women Team | Dainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या वर्ल्डकपमध्ये युवा भारतीय संघाचे नेतृत्व शफली वर्माने केले होते.

Shafali Verma | Dainik Gomantak

त्यामुळे ती 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकणारी पहिली कर्णधारही ठरली आहे.

Shafali Verma | Dainik Gomantak

विश्वविजेती कर्णधार म्हणून तिचे नुकतेच वर्ल्डकप ट्रॉफीबरोबर दक्षिण आफ्रिकेत फोटोशूटही झाले.

Shafali Verma | Dainik Gomantak

शफलीचे वर्ल्डकपबरोबरचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Shafali Verma | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे यंदा पहिल्यांदाच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात आला होता.

Shafali Verma | Dainik Gomantak

त्यामुळे पहिल्याच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मान शफाली वर्माच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाला मिळाला आहे.

U19 India Women Team | Dainik Gomantak

तसेच हे विजेतेपद भारतीय महिला क्रिकेटमधील देखील पहिलेच आयसीसी विजेतेपद ठरले आहे.

U19 India Women Team | Dainik Gomantak

19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांना बीसीसीआयकडून 5 कोटींचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

Shafali Verma | Dainik Gomantak
Shafali Verma | Dainik Gomantak