Pramod Yadav
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता नवा राहिला नाही.
आता पुन्हा एकदा उर्फी आणि चित्रा वाघ आमनेसामने आल्या आहेत.
याला महाराष्ट्रात सध्या गाजत असलेले शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओ मॉर्मिंगचे प्रकरण कारणीभूत ठरले आहे.
शितल म्हात्रे यांच्या समर्थनात भाजप नेत्या यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
यात त्यांनी शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत असे म्हटले आहे.
दरम्यान, यात व्हिडिओला उर्फीने रिट्विट करत वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यांची आठवण करून दिली.
तसेच, ढोंगीपणाची पण सीमा असते कोणीतरी त्यांना सांगा असे उर्फीने म्हटले आहे.