Rahul sadolikar
अभिनेता विकीकौशलचा आज 35 वा वाढदिवस... बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या स्टार्समध्ये विकी कौशलचं नाव घेण्यात येतं..
विकी कौशल हा प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक शाम कौशल यांचा मुलगा ;पण असं असुनही विकीला अनेकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं.
आपल्या करिअरची सुरूवात विकीने मसान या चित्रपटातून केली.
मुंबईच्या चाळीत एका सामान्य कुटूंबात विकीचा जन्म झाला. मसानने त्याच्यातला उमदा अभिनेता इंडस्ट्रीने पाहिला.
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ने विकी कौशलला मोठा स्टार बनवले. यानंतर विकीने 'राजी', 'संजू' आणि 'लस्ट स्टोरीज'सह अनेक हिट चित्रपट दिले.
विकी आता 'डंकी', 'साम बहादुर' आणि 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसणार आहे.
विकी कौशलने अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.