विराटने केली 6 वर्षांनी बॉलिंग

Pranali Kodre

भारताचा विजय

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला.

Team India

विराटचं शतक आणि गोलंदाजी

या सामन्यात चाहत्यांना विराटच्या शतकाबरोबरच त्याची गोलंदाजीही पाहायला मिळाली.

Virat Kohli

हार्दिक पंड्या जखमी

या सामन्यात 9 व्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने सरळ फटका खेळला, यावेळी पायाने हार्दिकने चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हार्दिक या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला बाहेर जावे लागले.

Hardik Pandya

विराटने घेतली जबाबदारी

यामुळेच त्याचे उर्वरित षटक विराट कोहलीने पूर्ण केले.

Virat Kohli

विराटची गोलंदाजी

विराट यावेळी तब्बल 6 वर्षांनी वनडेत गोलंदाजी करताना दिसला.

Virat Kohli

6 वर्षांपूर्वी...

यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोला झालेल्या वनडे सामन्यात विराटने अखेरच्यावेळी गोलंदाजी केली होती.

Virat Kohli

चौथ्यांदा गोलंदाजी

वनडे वर्ल्डकपबद्दल सांगायचे झाले, तर विराटने गोलंदाजी करण्याची ही चौथी वेळ होती.

Virat Kohli

वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी

विराटने यापूर्वी 2011 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध गोलंदाजी केली होती, तर 2015 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी केली होती.

Virat Kohli

गिलने कॅच घेतला अन् सारानं लक्ष वेधलं

Shubman Gill - Sara Tendulkar | X