Virat Kohli श्रीमंत किकेटपटुंच्या यादीत दुसऱ्या स्थानी

गोमन्तक डिजिटल टीम

आशिया खंडात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स क्रिकेटपटु विराट कोहलीला आहेत. विराटला इन्स्टाग्रामवर 220 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट अनेक ब्रँड एंडॉर्स करतो. त्यामध्ये पेप्सी, ऑडी इंडिया, मान्यवर, गूगल, एमआरएफ, प्युमा, मिंत्रा, टिस्सॉट इत्यादींचा समावेश आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

One8 आणि Wrogn हे विराटचे स्वतःचे ब्रँडस आहेत. विराटची One8 commune नावाची रेस्टॉरंट्स देशातील काही शहरांमध्ये आहेत. तो या रेस्टॉरंटस साखळीचा सहमालक आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट हा इंडियन सुपर लीगमधील एफसी गोवा या फुटबॉल क्लबचा संयुक्त मालकदेखील आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटकडे ऑडी R8, रेंज रोव्हर्स, ऑडी Q 7, फॉर्च्युनर, आणि रेनॉल्ड डस्टर या गाड्या आहेत. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माची एकुण संपत्ती 265 कोटी रूपये इतकी आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

फोर्ब्ज या नियतकालिकाच्या माहितीनुसार विराटची एकुण संपत्ती (नेट वर्थ) 127 मिलियन डॉलर म्हणजे 1048 कोटी रूपये इतकी आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटची श्रीमंत क्रिकेटपटुंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पहिल्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनची संपत्ती 1400 कोटी रूपये इतकी आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak
Dainik Gomantak