Pramod Yadav
तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते.
रविवारी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लाहोरमधील त्यांच्या घरी पोहोचले, मात्र ते घरात नव्हते.
दरम्यान, इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
अशात खान यांच्यावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत.
इम्रान खान यांना प्रेस कॉन्फरन्स घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, त्यांची भाषणे देखील टीव्हीवर दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे.
एवढेच नव्हे ARY टीव्हीने इम्रान यांचे भाषण दाखवले म्हणून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.