गोमन्तक डिजिटल टीम
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या शोधात सध्या पंजाब पोलिस आहेत. त्यासाठी पंजाब सध्या हाय अलर्टवर आहे.
'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याच्याबाबत यापूर्वीही पंजाबमध्ये गदारोळ झाला होता.
अमृतपाल सिंगला फरार घोषित करण्यात आले असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
गेल्या वर्षी रस्ते अपघातात मरण पावलेल्या अभिनेता दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेची सूत्रे अमृतपाल सिंगने आपल्या हाती घेतली.
मृतपाल सिंग हा एक स्वयंघोषित प्रचारक आहे, जो स्वतःला शीख समुदायाचा प्रतिनिधी म्हणून घेतो.
अमृतपाल सिंग खलिस्तानी समर्थक जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला आपला आदर्श मानतो.
अमृतपालने 10 वर्षे दुबईत आपल्या कुटुंबाच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम केले आहे.